रेल्वे प्रवास किती सुरक्षित? लोकलवर दगडफेक, महिला जखमी

गुरुवारी रात्री रेल्वेमार्गावरील मुंब्रा दिवा दरम्यान अज्ञात व्यक्तीकडून झालेल्या दगडफेकीत दिवा येथील रहिवासी कांचन हाटले गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे महिला प्रवाशांत संतापाचं वातावरण आहे. गुरुवारी मध्य रात्री झालेल्या मुंब्रा दिवा रेल्वे अपघातात दिवा येथील कांचन हाटले जखमी झाल्या. त्यांचे 2 दात तुटले आहेत. तसंच ओठाला जबर दुखापत झाली आहे. समाजकंटकाने केलेल्या हल्ल्यात त्या […]

रेल्वे प्रवास किती सुरक्षित? लोकलवर दगडफेक, महिला जखमी

गुरुवारी रात्री रेल्वेमार्गावरील मुंब्रा दिवा दरम्यान अज्ञात व्यक्तीकडून झालेल्या दगडफेकीत दिवा येथील रहिवासी कांचन हाटले गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे महिला प्रवाशांत संतापाचं वातावरण आहे.

गुरुवारी मध्य रात्री झालेल्या मुंब्रा दिवा रेल्वे अपघातात दिवा येथील कांचन हाटले जखमी झाल्या. त्यांचे 2 दात तुटले आहेत. तसंच ओठाला जबर दुखापत झाली आहे. समाजकंटकाने केलेल्या हल्ल्यात त्या जबर जखमी झाल्या. “माझ्यावर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल स्वरूपात घ्या. कारण हा फक्त माझ्याच नव्हे, तर सर्वांच्याच सुरक्षेचा प्रश्न आहे”, अशी प्रतिक्रिया कांचन यांनी दिली.

स्टेशन पासून दूर अंतरावर असलेल्या रेल्वे ट्रॅकवर फिरणारे गर्दुल्ले आणि तत्सम अज्ञात इसमांना आवर घालणं गरजेचं असल्याचं कांचन हाटले यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट होतं. हाटले यांच्याबाबतील घडलेल्या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. रेल्वे पोलीस बंदोबस्त वाढवावा, पोलीस गस्त वाढवावी अशा विविध मागण्या पुढे येऊ लागल्यात.

दरम्यान पोलीस गस्त वाढविण्यात येईल आणि महिला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अजून सुविधा करण्यात येतील, तसंच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोंबिवली लोहमार्ग एस व्ही पवार यांनी दिली आहे.

मात्र या दुर्घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number