एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं राज्यभर आंदोलन

राज्यातील विविध शहरांमध्ये शुक्रवारी एमएससीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा, या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरू आहे. एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे राज्यभरात आंदोलन सुरू असून एमपीएससीच्या राज्यसेवा परिक्षेच्या नव्या अभ्यासक्रमावरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. एमपीएससी […]

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं राज्यभर आंदोलन

राज्यातील विविध शहरांमध्ये शुक्रवारी एमएससीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा, या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरू आहे.

एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे राज्यभरात आंदोलन सुरू असून एमपीएससीच्या राज्यसेवा परिक्षेच्या नव्या अभ्यासक्रमावरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. एमपीएससी राज्य सेवा परिक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा, अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी सारे रस्त्यावर उतरले आहेत.

यापूर्वी देखील या प्रश्नावर आम्ही आंदोलन केले आहे.आता आम्ही मागे हटणार नसून विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय होत नाही, तोवर आम्ही अलका टॉकीज चौकातून जाणार नाही.असा इशारा एमपीएससी विद्यार्थीनी दिला आहे. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात येत आहे. जो पर्यत सरकार आणि आयोग मागणी पूर्ण करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याच या विद्यार्थ्यांनी सांगितले आङे

पुण्याप्रमाणेच कोल्हापूर, औरंगाबाद मध्येही विद्यार्थी एकत्र जमले आहेत.याच मागणीवर कोल्हापूरच्या सायबर चौकात मोठ्या संख्येने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, पुण्यासह नागपुरातही आंदोलन सुरु केले आहे. NSUI च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number