मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन उपस्थितीबाबत उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

मुंबईत आज नवीन मराठी भाषा  भवनाच्या इमारतीचा भूमीपूजनाचा कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमीपूजनाला दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती लावली. या कार्मक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली. मुख्यमंत्र्यांनी भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती लावली. […]

मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन उपस्थितीबाबत उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

मुंबईत आज नवीन मराठी भाषा  भवनाच्या इमारतीचा भूमीपूजनाचा कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमीपूजनाला दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती लावली. या कार्मक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळाली.

मुख्यमंत्र्यांनी भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती लावली. मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन उपस्थितीबाबत उपमुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ‘सीएमसाहेब तुम्ही आमच्या खात्याच्या कार्यक्रमांना येत नाहीत म्हणून नाराजी आणि मतभेदाच्या बातम्या येतात’, असे म्हणत पवारांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला.

यावर मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर केले नाही, तर त्यांचे कौतुक केले. दादा तुम्ही जेथे आहात, तिथे मी यायची गरज नाही, आपण एकत्रच आहोत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांचे कौतुक केले. तसेच नवीन मराठी भाषा भवनाच्या भूमीपूजनाचे श्रेय अजितदादांना आहे. त्यांनी जे संकल्पचित्र दाखवले ते अप्रतिम आहे. आजचा भूमीपूजन सोहळा फक्त नारळ फोडायचा नाही तर प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number