एसटी कर्मचारी संपावर ठाम

सोमवारी महाराष्ट्र राज्य कनिष्ट श्रेणी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी संपातून माघार घेतल्याची घोषणा केली. तर संपकारी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले. मात्र अजय कुमार यांच्या आवाहनाला एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद न देता आंदोलन सुरूच ठेवले आहेच. त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याचे चित्र सध्या दिसत नाही. मुंबईतील आझाद मैदानात संपकारी एसटी कर्मचाऱ्यांचा ४७वा […]

एसटी कर्मचारी संपावर ठाम

सोमवारी महाराष्ट्र राज्य कनिष्ट श्रेणी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी संपातून माघार घेतल्याची घोषणा केली. तर संपकारी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन केले. मात्र अजय कुमार यांच्या आवाहनाला एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद न देता आंदोलन सुरूच ठेवले आहेच. त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याचे चित्र सध्या दिसत नाही.

मुंबईतील आझाद मैदानात संपकारी एसटी कर्मचाऱ्यांचा ४७वा दिवस आहे. आजही कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. एसटी कर्मचारी विलिनीकरणावर ठाम असून आंदोलन सुरूच असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

धुळ्यातही एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या आदेशाशिवाय संप मिटवणार नाही, अशी भूमिका धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. तसेच धुळ्यातील कर्मचारीसुद्धा विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे.

अजय गुजर संपातून बाहेर

एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. तर स्वत: अजर गुजर संपातून बाहेर निघाले आहेत. अजय गुजर प्रणित संघटनेकडून संपाची नोटीस मागे घेतली असून एसटी संप मिटला असल्याची घोषणा अजय गुजर यांनी केली आहे. मात्र एसटी कर्मचारी विनिलीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे २२ डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत कामावर परत येण्याचे आवाहन अजय गुजर यांनी केले आहे.

एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी संपकारी एसटी कर्मचाऱ्यांना २२ डिसेंबरपर्यंत कामावर रुजू होण्यासाठी सांगितले आहे. मात्र आजही कर्मचाऱ्यांचे आंदोलनाचे चित्र राज्यात पाहायला मिळाले आहे. तसेच आता अजय गुजर यांनी केलेल्या आवाहनानंतर कर्मचारी संप मागे घेतात का?यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number