ST Workers DA Hike: प्रताप सरनाईकांची विधानसभेत मोठी घोषणा! एसटी कर्मचाऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’; सरकारकडून महागाई भत्त्यात भरघोस वाढ

अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

ST Workers DA Hike: प्रताप सरनाईकांची विधानसभेत मोठी घोषणा! एसटी कर्मचाऱ्यांसाठी ‘अच्छे दिन’; सरकारकडून महागाई भत्त्यात भरघोस वाढ

राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून आनंदाची घोषणा करण्यात आली आहे. परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदन देताना ही घोषणा केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांचा विचार करून महायुती सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून वाढवून 58 टक्क्यांपर्यंत करण्यात आला आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात (HRA) देखील महत्त्वपूर्ण वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून वाढवून 58 टक्के करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी लागू असलेला 8,16 आणि 24 टक्के घरभाडे भत्ता वाढवून तो आता अनुक्रमे 10,20 आणि 30 टक्के करण्यात आला आहे. याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीचा दरही 2 टक्क्यांवरून 3 टक्के करण्यात आला आहे.

या निर्णयाबाबत बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, 'काल एसटी महामंडळातील सर्व युनियन प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. राज्यभरात सेवा देणाऱ्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांचा विचार करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी संपाला वेगळे वळण लागले होते, मात्र सध्याच्या सरकारने कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेत योग्य तो निर्णय घेतला आहे', असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number