नव्या योजनांमुळे एसटी सुसाट

अनेकांना नेहमीच प्रश्न पडतो, सरकारने एसटीच्या एवढ्या योजना राबविल्या तर एसटी महामंडळ आणखी घाट्यात जाईल. मात्र, तसे होणार नसून, नव्या योजनांचा एसटी महामंडळाच्या प्रवाशांमध्ये आणि उत्पन्नात वाढ होण्यास मोठा हातभार लागणार आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविलेल्या योजनेमुळे एसटीच्या रोजच्या प्रवाशांमध्ये ५ लाखांनी वाढ झाली असून, शासनाच्या मिळणाऱ्या प्रतिपूर्ती रक्कमेतसुध्दा ७० ते ७५ कोटींनी वाढ […]

नव्या योजनांमुळे एसटी सुसाट

अनेकांना नेहमीच प्रश्न पडतो, सरकारने एसटीच्या एवढ्या योजना राबविल्या तर एसटी महामंडळ आणखी घाट्यात जाईल. मात्र, तसे होणार नसून, नव्या योजनांचा एसटी महामंडळाच्या प्रवाशांमध्ये आणि उत्पन्नात वाढ होण्यास मोठा हातभार लागणार आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविलेल्या योजनेमुळे एसटीच्या रोजच्या प्रवाशांमध्ये ५ लाखांनी वाढ झाली असून, शासनाच्या मिळणाऱ्या प्रतिपूर्ती रक्कमेतसुध्दा ७० ते ७५ कोटींनी वाढ झाली आहे.

एसटी महामंडळ विविध प्रकारच्या २९ योजना राबविते. त्या योजनांच्या बदल्यात शासनाकडून १४० कोटी रुपयांपर्यंतची प्रतिपूर्ती एसटी महामंडळाला मिळते. मात्र, ज्येष्ठ नागरिकांच्या योजनेमुळे एसटी महामंडळाला दुप्पट फायदा झाला आहे. १४० कोटींच्या प्रतिपूर्ती रकमेत ७५ कोटींची भर पडली आहे. त्यामुळे एसटीला आता २१० ते २१५ कोटी रुपयांपर्यंत महिना प्रतिपूर्ती रक्कम मिळत आहे. त्यासोबतच या नव्या योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे..

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number