‘एसटी संपावर लवकरच तोडगा निघेल’ – संजय राऊत

  एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दिवसेंदिवस एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर एसटी संपावर लवकरच तोडगा निघणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.   एसटी कर्मचारांबद्दल राज्य […]

‘एसटी संपावर लवकरच तोडगा निघेल’ – संजय राऊत

  एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दिवसेंदिवस एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर एसटी संपावर लवकरच तोडगा निघणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

  एसटी कर्मचारांबद्दल राज्य सरकारला सहानुभूती आहे. कामगारांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. आज शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत असे समजले की, शरद पवारांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना सूचना दिल्या आहेत, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ‘एसटी कर्मचऱ्यांच्या आंदोलनात तेल ओतण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील वातावरण कोण आणि का भडकवतेय हे सर्वांनाच माहित आहे’, असे संजय राऊत म्हणाले.

  एसटी संपाबाबत शरद पवार यांच्या मध्यस्थीला सुरुवात झाली असून एसटी संपाचा वाद मिटविण्यासाठी अनिल परब यांची शरद पवारांसोबत चर्चा पार पडली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शरद पवारांनी माहिती घेतली असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर कोणते पर्याय असू शकतात तसेच कर्मचारी आणि प्रवासी या दोघांचेही समाधान होणे आवश्यक असल्याचे अनिल परबांनी सांगितले आहे. तसेच एसटी उत्पन्न वाढविण्याच्या उपयांवरही बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number