राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अंतिम तोडगा काढण्यासाठी एसटी कर्मचारी सकारात्मक भूमिका घेतली आहे. एसटी कर्मचारी सरकारसोबत बैठक करण्यास तयार झाले आहेत.
राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहे. एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांन संप पुकारला आहे. तर या संपावर तोडगा काढण्यासाठी मागील आठ दिवसांपासून मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठका पार पडत आहेत. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सरकारसोबत चर्चा करून योग्य मार्ग काढण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी तयारी दर्शवली आहे.
एसटी महामंडळ राज्यशासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसोबत एसटी कर्मचाऱ्यांनी नव्या मागण्या समोर ठेवल्या आहेत. सातवा वेतन आयोगाप्रमाणे पगार हमी सरकारने द्यावी, सर्व कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घ्याव्यात, तसेच शिस्त आवेदन कार्यपद्धतीतील जाचक अटी रद्द कराव्यात, अशा नव्या मागण्या एसटी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.