जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सलग चौथा दिवस आहे. एसटी प्रशासन आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यामुळे सामान्यांचे मोठे हाल होतायेत.
दिवाळीच्या चौथ्या दिवशीही प्रवाशांचा खोळंबा होतोय. संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून हालचाली केल्या जातायेत.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या संपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्तक्षेप करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.