जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला एसटी कामगारांचा अघोषित संप मिटल्यानंतर एस टी पुन्हा एकदा रस्त्यावर धावू लागली आहे. संप शनिवारी रात्री अधिकृतपणे मागे घेण्यात आला.
वेतनवाढीबद्दल बैठक घेण्याची ग्वाही सरकारने दिल्यानं हा संप मागे घेण्यात आल्याचं संघटनांतर्फे सांगण्यात आलं.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. ऐन पावसात संपामुळे 2 दिवस प्रवाशांचे हाल झाले, मात्र आज सकाळपासून एस टी ची सेवा सुरळीत सुरू झालीय . आणि प्रवाशानी सुटकेचा निश्वास सोडलाय .
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता. त्यानंतर कामगार संघटना आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यात काही वेळापूर्वी बैठक पार पडली.
या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या. त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला. परिवहन मंत्र्यांनी एसटीच्या कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संप मागे घेण्याची विनंती केली त्यानंतर हा संप मागे घेतल्याचे जाहीर केले.
हा संप मागे घेतला गेल्याने राज्यभरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलं अघोषित संप, प्रवाशांचे झाले हाल…