उस्मानाबादेत एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

एसटी महामंडळ राज्य शासनाच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एसटी महामंडळ विलिनीकरणासाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. संपकारी कर्मचारी विलिनीकरणाच्य मुद्द्यावर ठाम असून गेल्या १०० दिवसांहून अधिक दिवस कर्मचारी आंदोलन करत आहे. त्यातच आता उस्मानाबादमधील एका संपकारी कर्मचाऱ्याने शुक्रवारी विषारी औषध घेत आत्महत्या केली असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हनुमंत अकोसकर असे […]

उस्मानाबादेत एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

एसटी महामंडळ राज्य शासनाच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एसटी महामंडळ विलिनीकरणासाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. संपकारी कर्मचारी विलिनीकरणाच्य मुद्द्यावर ठाम असून गेल्या १०० दिवसांहून अधिक दिवस कर्मचारी आंदोलन करत आहे. त्यातच आता उस्मानाबादमधील एका संपकारी कर्मचाऱ्याने शुक्रवारी विषारी औषध घेत आत्महत्या केली असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हनुमंत अकोसकर असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

उस्मानाबादमधील राहत्या घरी रात्री उशीरा या कर्मचाऱ्याने विष घेत आत्महत्या केली आहे. ते तुळजापूर आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. या कर्मचाऱ्याचा मृतदेह बस आंदोलन स्थळी आणल्यामुळे संपकारी कर्मचाऱ्यांमध्ये भावनिक वातावरण तयार झाले.

एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप विलिनीकरणाबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला नाही. त्यामुळे विलिनीकरणाचा निर्णय होत नसल्याने हनुमंत अकोसकर या संपकारी कर्मचाऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच सरकारच्या नाकर्तेपणामुळे कर्मचाऱ्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number