जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सातवा वेतन लागू करा आशा अनेक मागण्या घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी संपाच हत्यार उपसलंय. उद्या मध्यरात्रीपासून हे कर्मचारी संपावर जाणार आहे. त्यामुळे भर दिवाळीत प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. अनेक प्रश्नावरून सरकारवर टीका करणारी शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
कारण एसटी महामंडळ हे शिवसेनेच्या मंत्र्यांकडे आहे. तर हे आंदोलन करू नका असं परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आवाहन केलंय. जर आंदोलन केलंच तर कर्नाटकच्या 300 गाड्या महाराष्ट्र एस् टी च्या मदतीला येणार असल्याची अप्रत्यक्ष धमकीवजा सूचना एसटी महामंडळाने आंदोलक कर्मचाऱ्यांना दिलीय.