जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
सांगलीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी परिवहन खात्यानं जोरदार प्रयत्न सुरु केलेत.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन खात्यानं चक्क खासगी प्रवासी वाहतूक सुरु केलीय. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी याला विरोध केल्यानं सांगली बस स्थानकावर तणाव निर्माण झाला होता.
अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत ही खासगी सेवा सुरु केली. दरम्यान परिवहन खात्याने संप मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू केला असून एसटी कर्मचारी संतप्त झालेत.
या आंदोलक कर्मचारी संघटनेशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी.