जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळानं 10 टक्क्यांची हंगामी भाडेवाढ केलीय. त्यामुळे सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या तसंच फिरण्याचे बेत आखणाऱ्यांना याचा फटका बसणारेय.
शनिवारी मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू होणारेय. यात साध्या बससाठी 10 टक्के, निमआराम म्हणजेच शिवनेरी बससाठी 15 टक्के आणि शिवशाही बससाठी 20 टक्के भाडेवाढ करण्यात आलीय.
ही भाडेवाढ 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत वैध असेल. गेल्या तीन वर्षांपासून एसटी दिवाळीच्या काळात हंगामी भाडेवाढ करते.
खालील साधारण दर, वाढीव दर स्लीपर बस
मुंबई ते औरंगाबाद – साधारण दर 700 रुपये, वाढीव दर 1200 रुपये
मुंबई ते रत्नागिरी – साधारण दर600 रुपये, वाढीव दर 1200रुपये
मुंबई ते सोलापूर -साधारण दर600, वाढीव दर 1000रुपये
मुंबई ते कोल्हापूर -साधारण दर 600 रुपये , वाढीव दर 1000 रुपये
मुंबई ते नागपूर – साधारण दर 1500रुपये, वाढीव दर 3200 रुपये
मुंबई ते लातूर – साधारण दर 800 रुपये , वाढीव दर 1500 रुपये
मुंबई ते गोवा – साधारण दर 800 रुपये ,वाढीव दर- 1500 एसी स्लीपर
मुंबई ते हैद्राबाद , बंगलोर – साधारण दर1500 रुपये, वाढीव दर 2200 रुपये