जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दुध आणि दुग्धजन्य पदार्थ एसटीमधून वाहतूक करण्यास बंदी घालण्याचा निर्णय सरकारनं मागे घेतलाय.
‘जय महाराष्ट्र’च्या पाठपुरावामुळेच सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला. त्यामुळे ‘जय महाराष्ट्र’च्या टीमचे जाहीर आभार मानत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटे यांनी दिलीय.
दुग्धजन्य पदार्थ एसटीनं वाहतूक करण्यास बंदी घातल्यानं शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती.
मात्र, ‘जय महाराष्ट्र’नं याबाबतची बातमी लावून धरली होती. त्यानंतर सरकारला गांभीर्य कळाले आणि सकारात्मक निर्णय झाला अशी माहिती राहुल मोटेंनी दिलीय.