ऐन दिवाळीत संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; 7 दिवसांचा पगार कापला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   ऐन दिवाळीत संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय.  संपात सहभागी झालेल्या कामगारांचा 7 दिवसांचा पगार कापला जाणार आहे. न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला होता.  संप बेकायदेशीर ठरवल्यानंतर न्यायालयाचा अवमान होऊ नये म्हणून कारवाई करण्यात येणार आहे. संप करण्यापूर्वी 6 महिने राज्य सरकारला नोटीस देणं बंधनकारक असतं. मात्र, एसटी […]

ऐन दिवाळीत संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; 7 दिवसांचा पगार कापला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ऐन दिवाळीत संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आलाय.  संपात सहभागी झालेल्या कामगारांचा 7 दिवसांचा पगार कापला जाणार आहे.

न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला होता.  संप बेकायदेशीर ठरवल्यानंतर न्यायालयाचा अवमान होऊ नये म्हणून कारवाई करण्यात येणार आहे.

संप करण्यापूर्वी 6 महिने राज्य सरकारला नोटीस देणं बंधनकारक असतं. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी  संप करण्यापूर्वी 15 दिवस आधीच राज्य सरकारला नोटीस पाठवली होती.

या चार दिवसाच्या संपकाळात एसटी महामंडळाचे 22 कोटीचे नुकसान झाले आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number