मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर एस.टी बस ला भीषण आग लागली आहे. ही गणपतीसाठी ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. सकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली आहे. मुंबईतील परळ येथून रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे चालली होती. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर एस.टी बस ला भीषण आग लागली आहे. यापुर्वी ड्रायव्हरला याची चाहुल लागल्याने त्याने गाडी एका साईटला लावली. आणि गाडीत असणाऱ्या 57 प्रवाशांना खाली उतरवलं. यामुळे सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
मुंबईतील परळ येथून रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे ही बस गणेश भक्तांना घेऊन चालली होती. ही गणपतीसाठी ज्यादा गाड्या सोडण्यात आली होती. यावेळी हा प्रकार घडला आहे. यामुळे प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. तसेच गाडीत असणारे त्यांचे सामान मात्र जळाले आहे.
अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ खोळंबली होती. सध्या वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्याची माहिती आहे. सर्वजण गणेशोत्सवासाठी गावी निघाले होते. दरम्यान हा प्रकार घडला आहे. आग इतकी भीषण होती की सगळी बस जळून खाक झाली आहे.