जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बेस्ट उपक्रमाची सेवा आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेली असतानाच, किमान एसटी महामंडळाला तरी आर्थिक आधार मिळावा यासाठी एसटीला प्रवासी करातून सवलत मिळावी, असा मार्ग सुचविण्यात आला आहे.
राज्य सरकार एसटी महामंडळाकडून दरवर्षी 17.5 टक्के इतका प्रवासी कर आकारते त्यापैकी, 10 टक्के रक्कम भांडवली अंशदान म्हणून एसटीकडे गुंतवली जाते.
ही रक्कम राज्य सरकारकडून रोखीने न देता भांडवली अंशदानाच्या रुपाने गुंतविली जाते. पण, त्याऐवजी सरकारने ही रक्कम रोखीने द्यावी, अशी सूचनाही वारंवार केली जात आहे.
किमान प्रवासी करात सवलत दिल्यास महामंडळाची आर्थिक स्थिती बळकट होईल.