” आंम्हाला स्वेच्छामरणाची परवानगी द्यावी”, एसटी कामगाऱ्यांच राज्यपालांना पत्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई गेल्या दीड वर्षांपासून एसटीच्या कामगारांच्या वेतनाचा तिढा सुटलेला नाही. कमी वेतन आणि त्यातच कर्ज यामुळे एसटीच्या कामगारांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे एसटी कामगार आर्थिकदृष्टय़ा दुर्बल झाले असून मानसिकदृष्टय़ाही खचले गेले आहेत. त्यामुळे एसटीच्या कामगारांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे एका पत्राद्वारे त्यांच्या हाल अपेष्ठा सांगितल्या आहेत. या पत्रात कर्मचाऱ्यांनी […]

” आंम्हाला स्वेच्छामरणाची परवानगी द्यावी”, एसटी कामगाऱ्यांच राज्यपालांना पत्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गेल्या दीड वर्षांपासून एसटीच्या कामगारांच्या वेतनाचा तिढा सुटलेला नाही. कमी वेतन आणि त्यातच कर्ज यामुळे एसटीच्या कामगारांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे एसटी कामगार आर्थिकदृष्टय़ा दुर्बल झाले असून मानसिकदृष्टय़ाही खचले गेले आहेत. त्यामुळे एसटीच्या कामगारांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे एका पत्राद्वारे त्यांच्या हाल अपेष्ठा सांगितल्या आहेत.

या पत्रात कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे की, ‘गेल्या दीड वर्षांपासून एसटीच्या कामगारांचा वेतनाचा तिढा सुटलेला नाही. कमी वेतन आणि त्यातच कर्ज यामुळे हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे आम्ही आर्थिकदृष्टय़ा दुर्बल झालो असून मानसिकदृष्टय़ाही खचलो आहोत. हे पाहता आंम्हाला स्वेच्छामरणाची परवानगी द्यावी’. अशी मागणी एसटीच्या अकरा कामगाऱ्यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. कामगारांनी एसटी संघर्ष ग्रुपच्यावतीने हे पत्र दिले आहे.

गेल्या दीड वर्षांपासून वेतनवाढीसाठी भांडतानाच त्यासाठी संपही पुकारण्यात आला. मात्र, त्यानंतरही तोडगा निघालेला नाही. एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण करावे, करारपध्दत रद्द करुन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे एसटी कामगारांना वेतन देण्यात यावे या मागण्यांसाठी कामगारांचे सह्यांचे निवेदन सरकारकडे देण्यात आले आहे. सध्या कार्यरत असलेल्या एसटीच्या २२ संघटनांकडूनही यावर तोडगा काढण्यात आला नसल्याचे संघर्ष ग्रुपच्यावतीने सांगण्यात आले आहे. सध्या कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी होत असून कर्मचाऱ्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे स्वेच्छामरणाची परवानगी मागताना कोणताही दबाव नसल्याचे दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number