Amravati ST bus Accident : चालक केबिनमध्ये अडकला, ट्रकची काच फोडून….; अमरावतीत एसटी बस आणि ट्रकची भीषण धडक! 10 जण गंभीर

दर्यापूर-अमरावती मार्गावर  सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लखापूर गावा नजीक  एसटी बस व ट्रकची भीषण धडक झाली.

Amravati ST bus Accident : चालक केबिनमध्ये अडकला, ट्रकची काच फोडून….; अमरावतीत एसटी बस आणि ट्रकची भीषण धडक! 10 जण गंभीर

दर्यापूर-अमरावती मार्गावर सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लखापूर गावा नजीक एसटी बस व ट्रकची भीषण धडक झाली आहे. या अपघातात बसचे चालक-वाहक, ट्रकचे चालक तसेच इतर 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी झाले असून काही प्रवासी किरकोळ जखमी आहेत. तर या भीषण अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, दर्यापूर-अमरावती मार्गावरून जात असताना लखापूर फाटा ते आरळा फाटा दरम्यान एसटी बस आणि ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रक चालकाचे पाय केबिनमध्ये अडकले होते. ट्रकची काच फोडून त्यांची सुटका करण्यात आली. दोन्ही दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांसह स्थानिक लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा- Crime News: लग्नाला नकार दिल्याने प्रियकराचं भयंकर कृत्य; आधी प्रेयसीचा गळा दाबला, नंतर मृतदेहावर पेट्रोल ओतलं अन्…

तसेच रुग्णवाहिकेद्वारे रुग्णसेवक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार केले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्याची तयारी सुरू आहे. या अपघातामुळे दर्यापूर-अमरावती मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली असून, या अपघाताचा पुढील तपास दर्यापूर पोलीस करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number