जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अभिनेत्री श्रीदेवी यांचे अकाली निधन, त्यांच्या कुटुंबीयांसह, चाहत्यांसाठीही धक्कादायक होतं. अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन शनिवारी, 24 फेब्रुवारी रोजी रात्री दुबईमध्ये झाले. प्रायव्हेट जेटद्वारा श्रीदेवी यांचे पार्थिव, 72 तासांनी मुंबईत आणले. त्यामुळे आपल्या लाडक्या अभिनेत्रीचं अंतिम दर्शन घेण्यासाठी देशभरातील चाहत्यांनी अफाट गर्दी केली होती.
सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी सकाळी 9.30 ते 12.30 यावेळेत श्रीदेवी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर पांढऱ्या शुभ्र फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून अंतयात्रा निघाली. विलेपार्लेधील हिंदू स्मशानभूमीत श्रीदेवीयांच्या पार्थिवावर अंतसंस्कार करण्यात आले. पण, यावेळी स्मशानभूमीबाहेर अभिनेत्री सोनम कपूरचा राग अनावर झाल्याचं पाहायला मिळाला.
स्मशानभूमीकडे जाण्यापूर्वी सोनमला प्रसार माध्यमांच्या प्रतिनिंधींनी घेरावा घातला आणि तिला प्रश्न विचारू लागले. फोटो टिपण्यासाठी मिडीयाची होणारी गर्दी पाहून सोनमचा राग अनावर झाल्याने ती प्रसार माध्यमांवर भडकली.भावनिक प्रसंगावेळी प्रसारमाध्यमांच्या अशा वर्तनामुळे ती संतापली आणि तिनं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना खडेबोल सुनावले. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.