श्रीदेवी यांचे पार्थिव आज मुंबईत होणार दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई बॉलिबुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने बॉलिवुडमध्ये शोककाळा पसरली आहे, सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रीदेवी यांचे डेड सर्टीफीकेट अद्याप बनलेले नाही. श्रीदेवी यांचे डेड सर्टीफीकेट बनल्यानंतर त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात येईल, त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईच्या दिशेने साधारणता 5 ते 8 वाजताच्या दरम्यान दुबईतून निघेल रात्री 10 किंवा 11 […]

श्रीदेवी यांचे पार्थिव आज मुंबईत होणार दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलिबुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने बॉलिवुडमध्ये शोककाळा पसरली आहे, सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रीदेवी यांचे डेड सर्टीफीकेट अद्याप बनलेले नाही.

श्रीदेवी यांचे डेड सर्टीफीकेट बनल्यानंतर त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात येईल, त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईच्या दिशेने साधारणता 5 ते 8 वाजताच्या दरम्यान दुबईतून निघेल रात्री 10 किंवा 11 सुमारास त्यांचे पार्थिव मुंबईमध्ये पोहचेल.

त्यांचे पार्थिव सुरुवातीला त्यांच्या ग्रीन एकर्स या ठिकाणी नेण्यात येईल, त्यानंतर वर्सोवातील त्यांचा आवडता बंगला भाग्या या ठिकाणी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number