भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचा 11 वा अवतार असल्याचा जावईशोध लावला आहे.
हिंदू संस्कृतीतील 33 कोटी देव, पंचमहाभुतं यांबद्दल ट्विट करतानाच भारतमातेला आपण देवी मानतो आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रधानसवेक असून ते ज्या प्रकारे भारतमातेची सेवा करत आहे, त्यामुळे ते ही आमच्यासाठी देवासमान आहेत. याच भावनेतून मी त्यांना विष्णूचा अकरावा म्हटलं असल्याचं स्पष्टीकरण वाघ यांनी दिलंय.
भारताचे पंतप्रधान परम आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी हे श्री विष्णु चे अकरावे अवतार आहेत — Avadhut Wagh (@Avadhutwaghbjp) October 12, 2018
जगाच्या कल्याणासाठी प्रभू श्रीरामाने रामराज्य आणलं. कृष्णाने विश्वकल्याणासाठी देवकीपोटी जन्म घेतला. तसेच नरेंद्र मोदी हे आमच्यासाठी देव आहेत. असंही वाघ यांनी म्हटलंय. त्यामुळेच मोदींना आम्ही देव मानतो आणि यात काही गैर नाही अशी वाघ यांची भूमिका आहे