मुंबई, १९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मध्य रेल्वेच्या नाहूर आणि मुलुंड स्थानकादरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. येत्या शनिवार-रविवारी हा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. वीक एंडला लोकलने घराबाहेर जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेवरील रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी शनिवारी व रविवारी दोन दिवस मध्य मार्गावर विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या नाहूर आणि मुलुंड स्थानकादरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. येत्या शनिवार-रविवारी हा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. नाहूर ते मुलुंड दरम्यान दोन गर्डर लॉन्च करण्यासाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.
नाहूर आणि मुलुंड दरम्यानचा सध्याचा रोड ओव्हर ब्रिज उड्डाणपूल वाढलेल्या रस्त्यावरील वाहनांची वर्दळीसाठी अपुरा आहे. त्यामुळे नाहूर आणि मुलुंड दरम्यान विंच आणि पुली पद्धतीने २ गर्डर लॉन्च करण्यासाठी मध्य रेल्वे सर्व ६ मार्गांवर वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेणार आहे. त्याचबरोबर सध्याच्या या ROB चे विविध ब्लॉक घेऊन रुंदीकरण करण्याचे नियोजन आहे. एकूण १४ गर्डर्स भविष्यात सुरू करण्याचे नियोजित आहे, त्यापैकी २ गर्डर्सचा पहिला ब्लॉक शनिवार/रविवारी रात्री सुरू करण्याचे नियोजित आहे.
शनिवार आणि रविवारी मध्यरात्री ०१.२० वाजेपासून पहाटे ०४.२० वाजेपर्यंत ३ तास हा पॉवर ब्लॉक असेल. पाचव्या आणि सहाव्या लाईनवर मुलुंड आणि विक्रोळी दरम्यान अप आणि डाउन फास्ट आणि स्लो मार्गावर हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा रद्द राहतील. कल्याणच्या दिशेने ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल कर्जत लोकल ००.२४ वाजता सीएसएमटीवरुन सुटेल.कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेने ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वेळापत्रकानुसार असेल. ब्लॉकनंतर कल्याणसाठी पहिली लोकल वेळापत्रकानुसार असेल.