Mega Block : दिवा स्थानकात मध्यरात्री विशेष मेगा ब्लॉक! ठाणे-कल्याण सेवा साडेचार तास ठप्प; जाणून घ्या काय आहे पर्याय?

दिवा स्थानकात 13 आणि 14 जूनला मध्यरात्री 1.20 ते पहाटे 5.40 वाजेपर्यंत विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून यावेळी ठाणे-कल्याण लोकल सेवा साडेचार तास ठप्प राहणार आहे.

Mega Block : दिवा स्थानकात मध्यरात्री विशेष मेगा ब्लॉक! ठाणे-कल्याण सेवा साडेचार तास ठप्प; जाणून घ्या काय आहे पर्याय?

दिवा स्थानकात 13 आणि 14 जूनला मध्यरात्री 1.20 ते पहाटे 5.40 वाजेपर्यंत विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून यावेळी ठाणे-कल्याण लोकल सेवा साडेचार तास ठप्प राहणार आहे. दिवा स्थानकात नवीन पादचारी पूल (FOB) उभारणीसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

यावेळी कळवा–डोंबिवली दरम्यान अप आणि डाऊन धीम्या व जलद मार्गांवर ब्लॉक राहणार असून ब्लॉकदरम्यान ठाणे–कल्याण दरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत. तसेच अनेक लोकल गाड्या शॉर्ट टर्मिनेट आणि शॉर्ट ओरिजिनेट रद्द करण्यात येणार आहेत. कल्याणहून सुटणाऱ्या काही अप स्लो लोकल अप फास्ट मार्गावर वळविण्यात येणार असून ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाही. तसेच यावेळी संबंधित लोकल गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावणार आहेत. 

हेही वाचा- Retail Inflation: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! मे महिन्यात किरकोळ महागाई 3.93 टक्क्यांवर; कोणाला बसला सर्वाधिक फटका?

13 जून रात्री आणि 14 जून पहाटेच्या अनेक सीएसएमटी, ठाणे, कल्याण, अंबरनाथ, कसारा, कर्जत मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. काही लोकलचा प्रवास कुर्ला, ठाणे आणि परळ येथेच समाप्त होणार असून काही लोकल कुर्ला, ठाणे आणि कल्याण येथूनच सुरू केल्या जाणार आहेत. 

कोणार्क एक्सप्रेस आणि हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस सहाव्या मार्गावरून वळविण्यात येणार तसेच मेल-एक्सप्रेस गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचसोबत पायाभूत सुविधा आणि प्रवासी सुरक्षेसाठी ब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत माहितीनुसार नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number