श्रावण महिन्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरात विशेष व्यवस्था

नाशिक, १६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या शंकर मंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यात दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. या गर्दीचा विचार करून त्र्यंबकेश्वर येथे विशेष नियोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरच्या शंकर मंदिरात १५ सप्टेंबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. पण केंद्रीय आणि राज्यस्तरावरील राजशिष्टाचार म्हणून येणाऱ्यांना व्हीआयपी रांगेतून दर्शन घेता येणार आहे. […]

श्रावण महिन्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरात विशेष व्यवस्था

नाशिक, १६ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या शंकर मंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यात दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. या गर्दीचा विचार करून त्र्यंबकेश्वर येथे विशेष नियोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरच्या शंकर मंदिरात १५ सप्टेंबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. पण केंद्रीय आणि राज्यस्तरावरील राजशिष्टाचार म्हणून येणाऱ्यांना व्हीआयपी रांगेतून दर्शन घेता येणार आहे. भाविकांना दर्शनानंतर प्रसाद म्हणून राजगिरा लाडू दिला जाईल. रांगेत बिस्कीट पुडे, पाण्याची बाटली मोफत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

श्रावण महिन्यात पहाटे ५ पासून रात्री ९ वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. प्रत्येक श्रावण सोमवारी पहाटे ४ वाजता मंदिर खुले होणार आहे. स्थानिकांसाठी दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था आहे.

गुरुवार १७ ऑगस्ट २०२३ : निज श्रावण मासारंभ

श्रावण महिन्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरात विशेष व्यवस्था

१. श्रावण महिन्यात पहाटे ५ पासून रात्री ९ वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार
२. प्रत्येक श्रावण सोमवारी पहाटे ४ वाजता मंदिर खुले होणार
३. स्थानिकांना मंदिर उघडल्यानंतर सकाळी १० : ३० पर्यंत तर संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान दर्शन घेता येणार
४. स्थानिकांना दर्शनाकरिता येतांना रहिवासी पुरावा दाखवणे बंधनकारक
५. स्थानिकांना उत्तर महाद्वारातून प्रवेश
६. भाविकांच्या सोयीसाठी वातानुकूलित दर्शन बारी
७. जेष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था
८. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number