South Superstar Affair Rumors: थलापती विजयनंतर आणखी एका सुपरस्टारच्या ‘त्या’ एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा, संसारात येणार वादळ?

आता आणखी एका अभिनेत्याच्या संसारात वादळ येणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पण हा अभिनेता नेमका आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. 

South Superstar Affair Rumors: थलापती विजयनंतर आणखी एका सुपरस्टारच्या  ‘त्या’ एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा, संसारात येणार वादळ?

साऊथ सुपरस्टार थलापती विजयने चित्रपट सृष्टी सोडून तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली आहे. मात्र त्याच्या करिअरपेक्षाही त्याच्या वयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी विजयने पत्नी संगितासोबत घटस्फोट घेणार असल्याचे जाहीर केले. विजयचे विवाहबाह्य संबंध असल्याचे  आरोप केले होते. यादरम्यानेच त्याचे नाव साऊथची अभिनेत्री तृषा कृष्णनसोबत जोडले गेले. अशातच आता साऊथच्या आणखी एका अभिनेत्याच्या अफेअरची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता आणखी एका अभिनेत्याच्या संसारात वादळ येणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पण हा अभिनेता नेमका आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. 

हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून पुष्पा फेम अल्लू अर्जुन आहे.त्याचे नाव सीरत कपूरबरोबर जोडले जात आहे. या सगळ्याला निमित्त ठरला अर्जुनचा 44 वा वाढदिवस. यादरम्याने सोशल मिडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये अल्लू अर्जुनच्या प्रायव्हेट जेटसह सीरत कपूर दिसत आहे. हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होताच सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या आहेत. काहींनी तर त्यांच्या अफेअरच्या अफवा पसरवण्यास सुरूवात केली आहे. 

अल्लू अर्जुन आणि सीरत जवळचे मित्र आहेत हे कळल्यावर अनेकांना धक्का बसला. काही उपद्रवी वापरकर्त्यांनी अपमानजनक टिप्पण्या करण्यास सुरुवात केली. पण जेव्हा सीरत कपूरच्या एका अलीकडील पोस्टवर अत्यंत घाणेरड्या टिप्पण्या आल्या, तेव्हा हद्द ओलांडली गेली. तिला ‘अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी’ असेही म्हटले . या कमेंटवर  अभिनेत्रीने अशा संकुचित विचारसरणीच्या वापरकर्त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. 

सीरत कपूर ही एक भारतीय अभिनेत्री, कोरियोग्राफर आणि मॉडेल आहे. तिनं 2014 मधील ‘रन राजा रन’ या तेलुगू सिनेमाद्वारे आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ती जिद  या बॉलिवूड सिनेमात झळकली. सीरत 2023 मधील ‘सेव्ह द टायगर्स’  या सीरिजमध्ये आणि 2024 मधील Bhamakalapam 2 या सिनेमात दिसून आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number