दक्षिण कोरियाची प्रसिद्ध अभिनेत्री Kim Sae-Ron चं वयाच्या 24 व्या वर्षी निधन

सिनेमा क्षेत्रात पुनरागमनाची नव्या नावाने आणि नव्या चित्रपटासह येणार होती दर्शकांसमोर

दक्षिण कोरियाची प्रसिद्ध अभिनेत्री Kim Sae-Ron चं  वयाच्या 24 व्या वर्षी निधन

मुंबई: दक्षिण कोरियाची अभिनेत्री किम सॅ-रॉन तिचा घरी मृतावस्थेत आढळली. पोलिसांच्या माहितीनुसार, तिच्या मृत्यूमध्ये कोणतीही संशयास्पद बाब आढळली नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार ती पुनरागमनाची तयारी करत होत्या.

किमच्या एका ओळखीच्या व्यक्तीने एका मुलाखतीत सांगितले की, “ही घटना आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हती. तिने ‘गिटार मॅन’ या चित्रपटाद्वारे अभिनयात पुनरागमन करण्याचे ठरवले होते. अभिनयातून पैसे कमवून कॅफे सुरू करण्याचीही तिची योजना होती. अजूनही या घटनेवर विश्वास बसत नाही.” 
2009 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या किम सॅ-रॉन यांचे करिअर 2022 मध्ये मद्यप्राशन करून वाहन चालविल्याने अडचणीत आले होते. त्या वेळी तिला सोलच्या गँगनम जिल्ह्यात अनेक खांब आणि सुरक्षारक्षक रेलिंगला धडक दिली होती.

 त्यामुळे तिला 2023 मध्ये 20 दशलक्ष वॉन दंड लावण्यात आला होता. या घटनेनंतर नकारात्मक सार्वजनिक भावना निर्माण झाल्याने तिला नव्या भूमिका मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. तिचा जगभर बराच चाहतावर्ग आहे.

सामाजिक माध्यमामार्फ़त लाखो चाहत्यांनी शोक व्यक्त केला. किम सॅ-रॉन हीच अभिनय  क्षेत्रातील प्रवास हा अप्रतिम होता. तिने कमी वयातच यशप्रात्प्ती केली होती. कमी कमी वेळात मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number