सोनू निगमला कार्यक्रमात धक्काबुक्की

सोमवारी सायंकाळी आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या माध्यमातून चेंबूर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. सोनू निगमचा चेंबूर फेस्टिवलमध्ये लाईव्ह कार्यक्रम होता, कार्यक्रमानंतर सोनू निगम स्टेजवरून खाली उतरताना सोनू सोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांनी धावपळ केली. त्याचवेळी आमदाराचा मुलगा स्वप्निल फातर्फेकर याने सोनू निगम सोबत धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्की मध्ये सोनू निगम स्टेजच्या पायरीवरून खाली पडला, त्याला वाचवायला […]

सोनू निगमला कार्यक्रमात धक्काबुक्की

सोमवारी सायंकाळी आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या माध्यमातून चेंबूर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. सोनू निगमचा चेंबूर फेस्टिवलमध्ये लाईव्ह कार्यक्रम होता, कार्यक्रमानंतर सोनू निगम स्टेजवरून खाली उतरताना सोनू सोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांनी धावपळ केली. त्याचवेळी आमदाराचा मुलगा स्वप्निल फातर्फेकर याने सोनू निगम सोबत धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्की मध्ये सोनू निगम स्टेजच्या पायरीवरून खाली पडला, त्याला वाचवायला गेलेल्या सोनू निगमच्या अंगरक्षकांमधील दोन जण सुद्धा खाली पडल्याची माहिती समोर येतेय. या प्रकारात सोनू निगम सुदैवाने वाचले असून त्यांच्यासोबत टीममध्ये असलेला एक व्यक्ती जखमी झाला आहे.

मध्यरात्री सोनू निगमने चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. सोनू निगमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसी कलम ३४१, ३२३, ३३७ च्या अंतर्गत आमदार प्रकाश फातेरपेकर यांचा मुलगा स्वप्निल फातर्फेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहेत. स्वप्निल फातर्फेकर याने सोनू निगम सोबत का धक्काबुक्की केली? या धक्काबुक्कीचा मागचा उद्देश काय आहे? या संदर्भात अधिक तपास चेंबूर पोलीस करत आहेत.

कशी झाली धक्काबुक्की पाहुयात ?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number