जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती रुग्णालयानं दिली.
फेब्रवारीत सोनिया गांधींना श्वसनाचा त्रास झाला होता. त्यावेळीही त्यांना याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.