ईडी हजेरीपूर्वी सोनिया गांधी रुग्णालयात

काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावली होती. नॅशनल हेराल्ड प्रकरणी गांधी माता-पुत्रला ईडीने नोटीस बजावली असून राहुल गांधी यांना १३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. दरम्यान, ईडी हजेरीपूर्वी सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल […]

ईडी हजेरीपूर्वी सोनिया गांधी रुग्णालयात

काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावली होती. नॅशनल हेराल्ड प्रकरणी गांधी माता-पुत्रला ईडीने नोटीस बजावली असून राहुल गांधी यांना १३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. दरम्यान, ईडी हजेरीपूर्वी सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोनिया गांधी यांना दुसऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली सोनिया गांधींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते.

दरम्यान, राहुल गांधी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून त्यांना सोमवारी चौकशीसाठ हजर राहायचे आहे. तसेच सोनिया गांधी यांनी ईडीकडे चौकशी साठी वेळ मागितला होता. त्यानुसार सोनिया गांधी यांना २३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहायचे आहे.

काय आहे प्रकरण?

  • नॅशनल हेराल्ड’ वर्तमानपत्र पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुरू केलं होतं.
  • हे काँग्रेसचं मुखपत्र समजलं जायचं.
  • काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडलं.
  • २०१२मध्ये ‘यंग इंडिया’ कंपनीनं वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतलं.
  • सोनिया आणि राहुल गांधी ‘यंग इंडिया’ कंपनीचे संचालक.
  • हक्क घेताना १६०० कोटींची संपत्ती फक्त ५० लाखांत घेतल्याचा आरोप.
  • भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचा आरोप.
  • नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा हिस्सा.
  • राहुल आणि सोनिया यांना फसवणूक आणि षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवलं.
  • पटियाला हाऊस न्यायालयानं ठरवलं दोषी.
  • यंग इंडियाने फक्त ५० लाख रुपयांच्या बदल्यात असोसिएट जर्नल्सचे मालकी हक्क मिळवल्याचा आरोप.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number