वृत्तसंस्था, मुंबई
बॉलीवुड अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या चित्रपटाचं नाव ‘वीरे दी वेंडिग’ असं असुन गेल्या काही दिवसांपासुन ती या चित्रपटाच्या शूटिंगसाठी दिल्लीमध्ये होती.
या चित्रपटामध्ये सोनम कपूरशिवाय करीना कपूर आणि स्वरा भास्करम यादेखील मुख्य भुमिकेत आहेत. मात्र चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अचानक एक फोन आल्यामुळे सोनम शूटिंग सोडून तातडीने मुंबईला निघून आली. नक्की कुणाचा फोन आल्यामुळे सोनमने शूटिंग कॅन्सल केलं ? असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल.
ज्या एका फोनवर सोनमने तातडीने शूटिंग कॅन्सल केलं तो फोन तिचे वडिल अनिल कपूर किंवा भाऊ हर्षवर्धन कपूर यापैकी कुणीही केला नव्हता. तर हा फोन फिल्ममेकर राजकुमार हिरानी यांचा होता.
याआधी सोनमने संजय दत्त यांच्या बायोपिकवर आधारित चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं शूटिंग जवळजवळ पुर्ण झालेलं आहे. मात्र चित्रपटाच्या कथेत अचानक थोडासा बदल करावा लागल्याने सोनमला शूटिंग कॅन्सल करुन तातडीने मुंबईला यावं लागलं. सोनम फक्त एकाच दिवसासाठी मुंबईला आली होती. काम आटपुन लगेचच सोनमने दिल्लीला परत येऊन ‘वीरे दी वेंडिग’ या चित्रपटाचं शूटिंगमध्ये पून्हा बिझी झाली.