सोनमचा ‘या’ कारणामुळे ट्विटरला बाय-बाय…

अभिनेत्रींना ट्रोल करणं हे काही आता नवीन राहिलेलं नाही. सोनम कपूरला पुन्हा ट्रोल करण्यात आलं. मुंबईच्या रस्त्यांची दुर्दशा पाहून सोनमने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. या पोस्टला काही क्षणातच युजर्सने रिट्विट करत सोनमला चांगलच फैलावर घेतलं. सोनम कपूर पुन्हा ट्रोल सोनम आणि युजर्समध्ये खडाजंगी रस्त्यांच्या दुर्दशेवर केलं ट्विट युजर्सने घेतलं फैलावर युजर्सने सोनमला दिले सल्ले सोनमचा […]

सोनमचा ‘या’ कारणामुळे ट्विटरला बाय-बाय…

अभिनेत्रींना ट्रोल करणं हे काही आता नवीन राहिलेलं नाही. सोनम कपूरला पुन्हा ट्रोल करण्यात आलं.

मुंबईच्या रस्त्यांची दुर्दशा पाहून सोनमने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली.

या पोस्टला काही क्षणातच युजर्सने रिट्विट करत सोनमला चांगलच फैलावर घेतलं.

  • सोनम कपूर पुन्हा ट्रोल
  • सोनम आणि युजर्समध्ये खडाजंगी
  • रस्त्यांच्या दुर्दशेवर केलं ट्विट
  • युजर्सने घेतलं फैलावर
  • युजर्सने सोनमला दिले सल्ले
  • सोनमचा ट्विटरला बाय-बाय

वाचा सविस्तर संभाषण – 

सोनम – ‘मला शहरात पोहचायला दोन तास लागले. रस्ते खराब त्यात प्रदूषणसुद्धा वाढलं आहे. घरातून बाहेर पडणं म्हणजे एखाद्या वाईट स्वप्नासारखं आहे.’ 

युजर – ‘तुमच्यासारखे लोक सार्वजनिक वाहनांचा किंवा कमी इंधन लागणाऱ्या गाड्यांचा वापर करत नाहीत. तुझ्या आलिशान गाड्या केवळ तीन ते चार किमी प्रतिलिटर मायलेज देतात, तुझ्या घरातील एसीसुद्धा जागतिक तापमानवाढीसाठी जबाबदार आहेत. त्यामुळे सर्वांत आधी तू तुझ्यापासून होणारं प्रदूषण कमी कर,’ असा सल्ला त्याने दिला.

अनंतच्या या उत्तरामुळे सोनम चांगलीच भडकली.

सोनम – ‘तुझ्यासारख्या पुरुषांमुळे महिला सार्वजनिक वाहनांचा वापर करण्यास घाबरतात. कारण त्यांना छेडछाडीची भीती असते,

युजर – ’तर तुझ्या या वक्तव्याविरोधात मी तुला कोर्टातही खेचू शकतो. कारण मी तुझ्यासारखा पदवीविना न्यायाधीश नाही,’ असं शब्दात त्याने सोनमला सुनावलं.

यानंतर इतर युजरने छेडछाड आणि सार्वजनिक वाहन वापरण्याचा काय संबंध असा सवाल सोनमला विचारला.

TWEET22.png

 

 

अशातच सोनमने ट्विटर आणि इन्स्टाला रामराम ठोकलाय, तशी माहिती स्वत: सोनमने दिली.

 

 

TV Number
TV Number
TV Number
TV Number