काही दिवसांपूर्वी सोनालीने मुलगा रणवीरसोबतचा फोटो शेअर करत, एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. त्यानंतर आज फ्रेन्डशिप डेच्या निमित्ताने सोनालीने आपल्या सोशल अकाऊंटवर दोन मैत्रिणींसोबतचा एक फोटो शेअर करत, सर्व मित्रांचे आभार मानले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या कॅन्सरवर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. त्यामुळे हा फोटो काहीसा भावूक करणारा आहे. पण सोनालीचा मॅसेज मात्र खूपच पॉझिटीव्ह आहे. या फोटोत सोनाली बॉल्ड लूकमध्ये दिसतेय. म्हणजे, तिने डोक्याचे मुंडण केले आहे. पण तिच्या चेहऱ्यावरची भलीमोठी स्माईल नवी उमेद देणारी आहे.
हा फोटो हृतिक रोशनने काढला असून या फोटोत सोनाली तिच्या दोन मैत्रिणींसोबत आहे. यातील एक आहे, हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खान ही आहे.
#SwitchOnTheSunshine #OneDayAtATime #HappyFriendshipDay ?? pic.twitter.com/j6MF0UKyb7 — Sonali Bendre Behl (@iamsonalibendre) August 5, 2018