सोनाक्षीच्या प्रेमप्रकरणावर शिक्कामोर्तब

मुंबई २६ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा काही ना काही कारणाने चर्चेत असते. मध्यंतरी ती झहीर इक्बाल याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.परंतू या दोघांनीही या बद्दल अद्याप काही खुलासा केला नाही. परंतू आता या बद्दल एक विशेष माहिती आता समोर आली आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल […]

सोनाक्षीच्या प्रेमप्रकरणावर शिक्कामोर्तब

मुंबई २६ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा काही ना काही कारणाने चर्चेत असते. मध्यंतरी ती झहीर इक्बाल याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.परंतू या दोघांनीही या बद्दल अद्याप काही खुलासा केला नाही. परंतू आता या बद्दल एक विशेष माहिती आता समोर आली आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या संबंधी एक मोठा खुलासा झाला आहे. सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मा हिने अखेर सोनाक्षी सिन्हाच्या झहीर इक्बालसोबतच्या डेटिंगच्या चर्चांना दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी अर्पिताने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटोसामायिक केली होते. यात तिने सोनाक्षीचा उल्लेख “वहिनी” म्हणून संबोधले होते.

आपल्या इंस्टाग्राम स्टोरीत सोनाक्षीला वहिनी असे संबोधल्यानंतर अर्पिताने ती स्टोरी हटवून टाकली. त्यामुळे समाज माध्यमांवर चर्चा रंगू लागल्यात. त्यातच विशेष बाब म्हणजे अर्पिताने पोस्ट केलेल्या फोटोत सोनाक्षी ही इक्बाल च्या जवळ उभी असलेली दिसत आहे. त्यामुळे सोनाक्षी आणि इक्बाल यांच्यात प्रेमप्रकरण सुरु असल्याचे म्हंटले जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number