बहुचर्चित सोनई हत्याकांड; 20 जानेवारीला शिक्षा सुनावणी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक  1 जानेवारी 2013 रोजी अहमदनगर मधील सोनई या गावी प्रेमप्रकरणातून 3 जणांची हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे फक्त परिस्थितीजन्य पुराव्यांअभावी कोणत्याही प्रत्यक्षदर्शी शिवाय हा खटला सरकारी वकिलांना चालविला होता. एकूण 7 आरोपींपैकी 6 जणांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने तीन दिवसांपूर्वी दोषी ठरवले होते. सचिन सोहनलाल घारु (वय 23),संदीप राजू धनवार(वय 24) […]

बहुचर्चित सोनई हत्याकांड; 20 जानेवारीला शिक्षा सुनावणी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 1 जानेवारी 2013 रोजी अहमदनगर मधील सोनई या गावी प्रेमप्रकरणातून 3 जणांची हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे फक्त परिस्थितीजन्य पुराव्यांअभावी कोणत्याही प्रत्यक्षदर्शी शिवाय हा खटला सरकारी वकिलांना चालविला होता. एकूण 7 आरोपींपैकी 6 जणांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने तीन दिवसांपूर्वी दोषी ठरवले होते.

सचिन सोहनलाल घारु (वय 23),संदीप राजू धनवार(वय 24) आणि राहुल कंडारे (वय 26,तिघे राहणार गणेशवाडी, सोनई,तालुका नेवासा) अशी हत्या झालेल्या तीन युवकांची नावे आहेत. या प्रकरणात 6 आरोपींवरील शिक्षेची सुनावणी आज होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. दरम्यान, सोनई हत्येप्रकरणी निकाल आता 20 जानेवारीला लागणार आहे. याबाबत आज दोषींच्या शिक्षेबाबत युक्तीवाद करण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number