भाजप नगरसेवकाच्या मुलाचा पत्रकारावर हल्ला!

जळगाव जिल्ह्याच्या जामनेर येथील वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी लियाकत सैय्यद यांना गांधी चौकात मारहाण केली. आपल्याविरोधातील बातमी छापल्याच्या रागातून भाजप नगरसेवकाच्या मुलाने आपल्या साथीदारांसह पत्रकाराला मारहाण केली. दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान नगारखान्यात झालेल्या मारहाणीची बातमी त्यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये भाजपा नगरसेवकाचा मुलगा बाबुराव हिवराळे याचा उल्लेख करण्यात आला होता. या गोष्टीमुळे चिडलेल्या बाबुराव हिवराळे याने पत्रकार सय्यद […]

भाजप नगरसेवकाच्या मुलाचा पत्रकारावर हल्ला!

जळगाव जिल्ह्याच्या जामनेर येथील वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी लियाकत सैय्यद यांना गांधी चौकात मारहाण केली. आपल्याविरोधातील बातमी छापल्याच्या रागातून भाजप नगरसेवकाच्या मुलाने आपल्या साथीदारांसह पत्रकाराला मारहाण केली.

दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान नगारखान्यात झालेल्या मारहाणीची बातमी त्यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये भाजपा नगरसेवकाचा मुलगा बाबुराव हिवराळे याचा उल्लेख करण्यात आला होता. या गोष्टीमुळे चिडलेल्या बाबुराव हिवराळे याने पत्रकार सय्यद यांना या आधी आपल्याला धमकावलंही असल्याचं सांगण्यात येतं आहे. ‘तुम्ही प्रसिद्ध केलेल्या बातमीत मी एकटा नसून अन्य लोकांचाही सहभाग असताना माझ्या एकट्याच्याच नावाचा का उल्लेख केला, असा सवाल करून याचे परिणाम तुला भोगावे लागतील, अशी फोनवरून धमकीही दिली.

त्यानंतर बाबुराव हिवराळे आणि त्याच्या सहा साथीदारांनी मिळून पत्रकार लियाकत सैय्यद यांच्यावर हल्ला केला. लियाकत यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरूद्ध जामनेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी, फिर्यादी लियाकत सैयद यांना बाबुराव हिवराळे यांनी फोनवर सांगितले की तुम्ही प्रसीध्द केलेल्या बातमीत मी एकटा फिर्यादी एकटा नसून अन्य लोकांचे  पण नाव आहे. तु माझे एकट्याचे नाव कसे टाकले.  याचे परिणाम तुला भोगावे लागतील अशी फोन वरून धमकी देण्यात आली 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number