मुलानेच केली आईची हत्या, घरातच जाळला मृतदेह

माथेफिरू तरुणाने आपल्या जन्मदात्या आईचीच विळ्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना वाशिम येथील मंगरुळपीर येथे घडली आहे. हत्येनंतर घरातच आईचा मृतदेह या तरुणाने जाळला. यावेळी मध्यस्थी करायला आलेल्या दोन महिलांनाही या तरुणाने जखमी केलं.     काय घडलं नेमकं? मंगरुळपीर शहरालगत असलेल्या पंचशील नगरमध्ये गावंडे कुटुंब वास्तव्यास आहे. रात्री साडेतीन वाजता अतुल गावंडे याने आपल्या 67 […]

मुलानेच केली आईची हत्या, घरातच जाळला मृतदेह

माथेफिरू तरुणाने आपल्या जन्मदात्या आईचीच विळ्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना वाशिम येथील मंगरुळपीर येथे घडली आहे. हत्येनंतर घरातच आईचा मृतदेह या तरुणाने जाळला. यावेळी मध्यस्थी करायला आलेल्या दोन महिलांनाही या तरुणाने जखमी केलं.

 

 

काय घडलं नेमकं?

मंगरुळपीर शहरालगत असलेल्या पंचशील नगरमध्ये गावंडे कुटुंब वास्तव्यास आहे. रात्री साडेतीन वाजता अतुल गावंडे याने आपल्या 67 वर्षीय आई विमलबाईला विळ्याने वार करून ठार केले. त्यानंतर रॉकेल टाकून घरातच मृतदेह जाळला. दरम्यान, आईला मारत असताना पत्नी आणि वहिनी मध्यस्थी करू लागल्या. तेव्हा त्यांच्यावरही विळ्याने वार करून तरुणाने जखमी केलं. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रात्री साडेतीन वाजता मंगरुळपीर पोलिसात फोन आला. त्यावर माहिती मिळताच गावंडे यांच्या घरी पोलीस पोहोचले. यानंतर त्यांनी आरोपी अतुल गावंडे याला अटक केली. हा खून कौटुंबिक वादातून झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हत्येचा पुढील तपास सुरू आहे. आईची हत्या करण्याच नेमकं कारण हे तपासानंतर निष्पन्न होईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number