जय महाराष्ट्र न्यूज, लातूर
लातूर जिल्ह्यातील ‘भादा’ गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मुलीला जावयाकडून होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी मध्यस्थी केलेल्या सासऱ्याच्या नाकाला जावयाने चावा घेतल्याची आश्चर्यजनक घटना लातूरमध्ये घडली आहे.
‘संतोष यादव’ असं या जावयाचं नाव असून जावयाने चावा घेत चक्क सासऱ्याच्या नाकाचा तुकडाच पाडला आहे. संतोष पत्नीला कायम मारहाण करतो. यामुळे कायम तणावाखाली राहणारी पत्नी लहान बाळाला घेऊन माहेरी आली होती, त्यानंतर तो तिला घरी घेऊन जाण्यासाठी तिथे आला होता.
त्यावेळी तो दारुच्या नषेत होता, त्याने आपल्या पत्नीला मारहाण सुरु केली. दरम्यान सासरे आपल्या मुलीला सोडवण्यास गेले असता संतोषने सासरे नागनाथ यांच्या नाकाला चावा घेतला, यामध्ये त्यांच्या नाकाचा शेंडा तुटला. नागनाथ शिंदे यांनी जावई संतोष विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.