छत्रपती संभाजीनगर, ११ जून २०२३, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगरमध्ये अताउर रहेमान पटेल याने औरंगजेबाचा राज्याभिषेक वर्धापन दिन साजरा करण्याबाबत फेसबुक पोस्ट केल्याची बातमी समोर आली आहे.
सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या फोटो वरून अहमदनगर, संभाजी नगर, कोल्हापूर या ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण झाला होता. आता नवी मुंबईत देखील औरंग्याचा फोटो स्टेटसला ठेवल्याने पुन्हा वाद निर्माण झाला आहे. शिवराज्याभिषेक दिनी मुस्लीम तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं वादाची ठिणगी पडलीय.
अताउर रहेमान पटेल याने “१३ जुन १६५९ को औरंगजेब आलमगीर का राज्यभिषेक का ३६४ वा. वर्धापनदिन है धुमधाम से साजरा करना चाहीये”अशा आशयाचे पोस्ट फेसबुक केले आहे. सदरील पोस्ट फेसबुक प्रोफाइलवर अपलोड करून माझ्या व इतरांच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याने सदर फेकबुक धारक अताउर रहेमान पटेल याच्या विरूध्द कायदेशीर करवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष चंद्रकांत रावसाहेब नवपुत यांनी केली.