…तर महाड पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली असती !

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा   सातारा जिल्ह्यात महाड पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे फलटण- बारामती रस्त्यावरील सोमंथळी पुल पाण्याने वाहून गेला. पुल वाहून गेल्याची बाब स्थानिकांच्या वेळीच लक्षात आल्यामुळे पुलावरुन होणारी वाहतूक थांबवण्यात आली. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे कुठल्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही.   पुल वाहून गेल्यामुळे फलटण-बारामती रस्ता बंद केला असून पर्यायी […]

…तर महाड पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली असती !

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

सातारा जिल्ह्यात महाड पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे फलटण- बारामती रस्त्यावरील सोमंथळी पुल पाण्याने वाहून गेला. पुल वाहून गेल्याची बाब स्थानिकांच्या वेळीच लक्षात आल्यामुळे पुलावरुन होणारी वाहतूक थांबवण्यात आली. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे कुठल्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही.

 

पुल वाहून गेल्यामुळे फलटण-बारामती रस्ता बंद केला असून पर्यायी वाहतूक कांबळेश्वरनगरमधून सुरु करण्यात आली आहे. पोलिस निरिक्षकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अनूचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेतली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number