राऊतांच्या निकटवर्तीयांविरोधात सोमय्यांनी केली तक्रार

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जम्बो कोव्डिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्याविरोधात आरोपींवर सात दिवसात गुन्हा दाखल करून आझाद मैदान पोलिसांनी कारवाई करावी. पोलिसांनी कारवाई न केल्यास न्यायालयात तक्रार करणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात […]

राऊतांच्या निकटवर्तीयांविरोधात सोमय्यांनी केली तक्रार

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जम्बो कोव्डिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्याविरोधात आरोपींवर सात दिवसात गुन्हा दाखल करून आझाद मैदान पोलिसांनी कारवाई करावी. पोलिसांनी कारवाई न केल्यास न्यायालयात तक्रार करणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात जम्बो कोव्डिड घोटाळ्याप्रकरणी ८९ पानांची तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांनी कोव्हिड रुग्णांच्या जीवाशी खेळ करून करोडो रुपयांचा खेळ केला. त्यामुळे राऊतांच्या निकटवर्तीयांविरोधात सोमय्यांनी तक्रार केली असून सुजित पाटकरवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरसंदर्भात आरोप केले आहेत. वर्षाकाठी लाखभर रुपयांचे उत्पन्न असलेल्या एका व्यक्तीला कोविड सेंटरचे १०० कोटी रुपयांच्या कंत्राटाचा लाभ देण्यात आल्याचा खळबळजनक खुलासा किरीट सोमय्या यांनी केला आहे. कंपनी अस्तित्वात नसतानाही १०० कोटींचे कंत्राट दिले. त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदारांविरोधात कारवाई झाली पाहिजे. तसेच बोगस कागदपत्रे दाखवून सुजित पाटकर यांनी ही कंपनी स्थापन केली असल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number