‘सोमय्या पिता-पुत्र देशाबाहेर पळण्याच्या तयारीत’ – संजय राऊत

आयएनएस विक्रांत युद्धनौका घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी गैरहजर राहिलेले भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी सोमय्यांना वाचवण्यासाठी बनावट पुरावे तयार केले जाऊ शकतात, असेही राऊत म्हणाले. पोलिसांनी सोमय्या पिता-पुत्रांना विक्रांत युद्धनौका घोटाळ्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, […]

‘सोमय्या पिता-पुत्र देशाबाहेर पळण्याच्या तयारीत’ – संजय राऊत

आयएनएस विक्रांत युद्धनौका घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी गैरहजर राहिलेले भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी सोमय्यांना वाचवण्यासाठी बनावट पुरावे तयार केले जाऊ शकतात, असेही राऊत म्हणाले.

पोलिसांनी सोमय्या पिता-पुत्रांना विक्रांत युद्धनौका घोटाळ्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, सोमय्या पिता-पुत्र महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. त्यांना भाजपाने लपवून ठेवले आहे. तसेच त्यांना अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे, जामीन मिळेपर्यंत ते दोघेही देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या यांनी नागरिकांना धमकी देत कोट्यवधी रक्कम जमा केली आहे. तसेच याप्रकरणी बनावट पुरावे तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे काही चुकले तर राजभवनाची इज्जतही जाईल, असा इशाराही राऊतांनी दिला आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेता किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विक्रांत युद्धनौकेच्या नावावर ५८ कोटी रुपयांची रक्कम लाटली असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. संजय राऊतांनी आरोप केला की, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०१४ साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत ५७ ते ५८ कोटी रुपयांची रक्कम झाली होती. पण ही रक्कम राज्यपाल कार्यालयात पोहचली नसल्याचे समोर आले आहे. सोमय्यांनी विक्रांत युद्धनौकेच्या नावावर लाटलेली रक्कम २०१४च्या निवडणूकीसाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला आहे. हा घोटाळा म्हणजे किरीट सोमय्यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतरणा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number