माणूस आणि प्राणी यांच्यातील अतूट नात्यांच्या अनेक गोष्टी एेकल्या आणि बघितल्याही आहेत, अशीच गोष्ट आहे तेजा नावाच्या श्वानाची.
विठ्ठल मंदिरात आल्यावर न चूकता देवासमोर नतमस्तक होणाऱ्या तेजाने काल शेवटचा श्वास घेतला.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलात गेली नऊ वर्ष कर्तव्य तत्पर सेवा बजावणाऱ्या बॉम्ब शोधक पथकातील लब्रॉडोर जातीच्या तेजा नावाच्या श्वनाचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यावर शासकीय मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील. अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते. पोलीस उपअधीक्षक युनुस आतार. उपनिरीक्षक बारवकर. निरीक्षक दंताळ. बी.डी.डी.एस.पथकाचे उपनिरीक्षक मस्के व इतर अधिकारी उपस्थित होते.
कोण होता हा तेजा श्वान?