जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर
पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये संताप निर्माण झालाय. एकीकडे महागाईने सर्वसामान्य जनतेचे हाल होत असताना दुसरीकडे पेट्रोलचा भडका उडत आहे.
मुंबई, बंगळुरू, दिल्ली कोलकातापेक्षाही सोलापुरात पेट्रोलचे दर जास्त आहेत.
सोलापुरमध्ये पेट्रोलला एका लिटरसाठी 81.10 पैसे मोजावे लागत असल्याने वाहन चालक हवालदिल झाले आहेत.
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल सोलापुरात मिळत असल्याने सोलापूरकरांनी संताप व्यक्त केलाय.