जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर
आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. मराठा समाजाने रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले आहे.
मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा 2 वर्षांपासून लढा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा सोलापूर शाखेने शिवाजी चौकात शनिवारी चक्काजाम आंदोलन केले.
आंदोलकांनी 2 एसटी बसची तोडफोड केल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. चक्काजाम आंदोलनामुळे पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली.
आंदोलकांनी मोठ्या संख्येने शिवाजी चौक आणि संभाजी चौकात ठिय्या मांडला. मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला आहे.
त्यानंतर शहर पोलिसांनी मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे. तर दुसरीकडे लातूर-सोलापूर मार्गावर मराठा संघटनेने ठिय्या आंदोलन केल्याने दोन्ही बाजुने वाहनांची कोंडी झाली आहे.
आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक
अविश्वास प्रस्तावावर मोदी सरकारने जिंकला विश्वास…
12 वर्षांनी पाकिस्तानच्या सलामीवीरांनी मोडीत काढला विश्वविक्रम…