Solapur Heavy Rain: मुसळधार पावसामुळे सोलापुरात गंभीर पूरस्थिती, 26 गावांचा संपर्क तुटला; प्रशासन अॅक्शन मोडवर

सोलापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे.

Solapur Heavy Rain: मुसळधार पावसामुळे सोलापुरात गंभीर पूरस्थिती, 26 गावांचा संपर्क तुटला; प्रशासन अॅक्शन मोडवर

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. विशेषतः माढा आणि करमाळा तालुक्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे 26 गावांचा संपर्क तुटला असून, तब्बल 1,800 ग्रामस्थ अडकले आहेत. प्रशासन तातडीने कार्यवाही करत असून, या लोकांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी केले जात आहे.

करमाळा तालुक्यातील 10 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून, तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी धोकादायक परिस्थितीत लोकांना हातात काठी घेऊनच परतवले. अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे सीना आणि कोळेगाव धरणाची क्षमता ओलांडली असून, 52 हजार क्यूसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडले गेले आहे. यामुळे माढा आणि करमाळा तालुक्यातील गावांवर महापूराचा परिणाम झाला आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पावसाचा कहर! 'या' 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी; पुढील 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे

माढा तालुक्यात 1,200 आणि करमाळा तालुक्यात 650 लोकांचे स्थलांतर सुरु केले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, कारण आज संध्याकाळपर्यंत पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

मोहोळ तालुक्यातील साबळेवाडी गावात सीना नदीच्या पाण्यामुळे शेतात पाणी घुसले असून, सोयाबीन, तुर, कांदा आणि ऊस यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या सीना नदीमध्ये 2 लाख क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे, ज्यामुळे नदीला महापूर आलेला आहे. माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतील अनेक गावांना पूराचे पाणी आले आहे.

हेही वाचा: Eknath Shinde On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबद्दल एकनाथ शिंदेंनी केला मोठा खुलासा, काय म्हणाले?

बार्शी तालुक्यातील चांदणी नदीला पूर आल्याने गावाकडे जाणारे पूल पाण्याखाली गेले आहेत. आगळगाव, मांडेगाव, खडकलगाव, धस पिंपळगाव, देवगाव आणि कांदलगाव या गावांचा संपर्क तुटला आहे. या पावसामुळे उडीद, कांदा, सोयाबिन यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील प्रशासन सतत ॲक्शन मोडमध्ये आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी बचावकर्मी तैनात आहेत. तसेच, नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची सूचना मिळाली आहे.

या गंभीर परिस्थितीत प्रशासनाचे आणि स्थानिक लोकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. सध्या नदीपात्रात पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांनी धोक्यापासून स्वतःला दूर ठेवणे गरजेचे आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number