जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर
सोलापुरातील युनिक हॉस्पिटलमध्ये अनुश्रीच्या पोटी जन्माला आलेल्या बाळाच्या हृदयाची वाढ न झाल्यानं ते पोटातच दगावले.
नऊ महिने पोटात वाढवलेल्या आपल्या पोटच्या गोळ्याचा जन्मताच मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार न करता त्या चिमुकलीचा मृतदेह प्रयोगशाळेला दान करण्याचा निर्णय सोलापुरातल्या एका दाम्पत्यानं घेतलाय.
आई अनुश्री आणि वडील प्रसाद मोहिते असं या दाम्पत्याचं नाव आहे.