फिल्मी स्टाईलने दरोडेखोरांनी लुटली तब्बल नऊ वाहनं

 जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर सोलापुरात शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी अक्षरशः हैदोस घातलाय. बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर मध्यरात्रीनंतर जाणाऱ्या वाहनांना दरोडेखोरांनी अडवून फिल्मीस्टाईलने लूट केलीय. सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने वाहनं थांबवून दहशत माजवली आणि एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ प्रवासी वाहनं दरोडेखोरांनी लुटली. प्रवाशांच्या अंगावरील दागिन्यांसह मोठ्या प्रमाणात रोकड दरोडेखोरांनी पळवली. इनोव्हा, स्कॉर्पिओ, अल्टो यांसह खाजही ट्रॅव्हल कंपन्यांच्या दोन बसेसचा […]

फिल्मी स्टाईलने दरोडेखोरांनी लुटली तब्बल नऊ वाहनं

 जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर

सोलापुरात शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी अक्षरशः हैदोस घातलाय. बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर मध्यरात्रीनंतर जाणाऱ्या वाहनांना दरोडेखोरांनी अडवून फिल्मीस्टाईलने लूट केलीय. सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने वाहनं थांबवून दहशत माजवली आणि एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ प्रवासी वाहनं दरोडेखोरांनी लुटली. प्रवाशांच्या अंगावरील दागिन्यांसह मोठ्या प्रमाणात रोकड दरोडेखोरांनी पळवली.

इनोव्हा, स्कॉर्पिओ, अल्टो यांसह खाजही ट्रॅव्हल कंपन्यांच्या दोन बसेसचा  यात समावेश होता. दरोडेखोरांनी फक्त लूटमारच केली नाही तर लहान मुलं आणि महिलांनाही मारहाणही केली. भयभीत झालेल्या प्रवाशांनी सकाळी कुर्डुवाडी पोलीस स्टेशन गाठलं आणि दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number