Solapur Crime News: कोवळ्या वयात लादलं मातृत्वाचं ओझं; 34 अल्पवयीन मातांची माहिती लपवली; डॉक्टरांसह नातेवाईकांवर कारवाई

या प्रकरणात 34 बालविवाह उघड झाले असून माहिती दडवणाऱ्या डॉक्टरांसह संबंधितांवर POCSO अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Solapur Crime News: कोवळ्या वयात लादलं मातृत्वाचं ओझं; 34 अल्पवयीन मातांची माहिती लपवली; डॉक्टरांसह नातेवाईकांवर कारवाई

सोलापूर: ‘कुंपणानेच शेत खावे’ असा संतापजनक प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे. एकीकडे आपण पुरोगामी महाराष्ट्राचा अभिमानाने उल्लेख करतो, तर दुसरीकडे समाजातील एका अंधाऱ्या कोपऱ्यात आजही चिमुकल्या मुलींचे बालपण बालविवाहाच्या बेडीत अडकले जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण करणारी एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक आकडेवारी सोलापुरातून समोर आली आहे. महात्मा जोतिबा फुले सामाजिक संस्थेने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा अंधारलेला सत्य प्रकार प्रकाशात आला असून, कोवळ्या वयात मातृत्वाचे ओझे वाहणाऱ्या अनेक अल्पवयीन मुलींच्या विदारक कथांनी संपूर्ण राज्य हादरून गेले आहे.

कायद्याने बालविवाहाला बंदी असतानाही, सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात कायद्याची सर्रास पायमल्ली होत असल्याचे यातून उघड झाले आहे. गेल्या केवळ दोन वर्षांत, सोलापूर महानगरपालिका आणि खाजगी रुग्णालयांमध्ये तब्बल 34 अल्पवयीन मुली गरोदर राहून उपचारासाठी दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या केवळ आकडेवारी नसून, अज्ञानाच्या अंधकारात बळी गेलेल्या निष्पाप बालपणांच्या या वेदनादायी कहाण्या आहेत.

या प्रकरणातील सर्वात संतापजनक आणि चीड आणणारा पैलू म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा. उपचारासाठी आलेली गरोदर मुलगी ही अल्पवयीन असल्याचे वैद्यकीय तपासणीत अगदी स्पष्ट होत होते. अशा संवेदनशील आणि गंभीर गुन्ह्याची माहिती तत्काळ पोलिसांना देणे हे डॉक्टरांचे कायदेशीर कर्तव्य असते. मात्र, कर्तव्यात कसूर करत या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना अंधारात ठेवले आणि या गुन्ह्याला अप्रत्यक्षपणे पाठीशी घालण्याचेच काम केले. यामुळे वैद्यकीय क्षेत्राच्या विश्वासार्हतेवरच एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा: Vidhan Parishad Election 2026: जागा एक, दावेदार अनेक अन् ‘मातोश्री’वर ‘सेटिंग’; विधान परिषदेसाठी ‘या’ बड्या नेत्यांची फिल्डिंग

ही माहिती दडवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस येताच सोलापूर शहर पोलीस तत्काळ ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जात कसून तपास सुरू केला. प्राथमिक तपासातच पोलिसांच्या हाती मोठे धागेदोरे लागले असून, केवळ सोलापूरच नव्हे तर पुणे आणि कोल्हापूर भागातील विविध बालविवाह आणि अल्पवयीन मातांची प्रकरणे उघडीस आली आहेत. सामाजिक संस्थेने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

या क्रूर मानसिकतेवर कायद्याचा बडगा उगारत, सोलापूर पोलिसांनी आतापर्यंत दहा प्रकरणांमध्ये थेट गुन्हे दाखल केले आहेत. यात केवळ बालविवाह लावून देणारे पती आणि नातेवाईकच अडकले नाहीत, तर माहिती दडवून ठेवणारे डॉक्टरही कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.

या सर्वांवर कठोर अशा ‘पोक्सो’ (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समाजातील या विदारक वास्तवाने सर्वांनाच आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले असून, पोलीस या प्रकरणाचा आणखी सखोल तपास करत आहेत. यातून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हेही वाचा: Malegaon Bomb Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील चारही आरोपींची निर्दोष मुक्तता; 37 निष्पापांचा गेला होता बळी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number